राजमुद्रा ; आगामी विधानसभेच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवत शिक्षा केली आहे. त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा दिली आहे.त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे . . गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला होता. राऊतांनी मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठानवर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळयाचे आरोप केले होते. याप्रकरणी माझगाव न्यायालयाने राऊतांना दोषी ठरवले असून 15 दिवसांची कैद सुनावल्याची माहिती समोर आली आहे मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाणून बुजून हा निकाल दिला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत नुसते वेगवेगळे दावे करीत असतात. आमच्यावर शंभर कोटीच्या शौचालय भ्रष्टाचार आरोप केला परंतू एकही कागदपत्र आणू शकले नाही. मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देतो की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदक खायला तुमच्या घरी गेल्याने न्यायालय असे निकाल देत असा उल्लेख अपिल याचिकेत करावाच असे किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.आता संजय राऊत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
यानंतर मेधा सोमय्या म्हणाल्या, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास होता त्यामुळे देवाच्या रुपाने न्यायालयाने त्यांना शिक्षा केली. बेताल वक्तव करणार असाल तर सहन करणार नाही, हेच दाखवण्याचा मी प्रयत्न केला.जी संस्था मुलाप्रमाणे वाढवली त्यावर कोणी डाग लागत असेल तर त्याला समोरे जाईल असेही त्या म्हणाल्या आहेत . दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांना पंधरा दिवसाचा कारावास भोगावा लागणार आहे .