राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहेअशातच आता शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित युवा सेनेनं एकतर्फी विजय मिळवलाय. युवासेनेनं भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला धूळ चारली आहे.याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ या सोशल मिडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत या विजयाबद्दल आभार मानले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे तसेच अयोध्या पौळ यांनीही पोस्ट शेअर करत विरोधकांना डिवचलंय. ‘अगोदर पोराशी निपटा.. बापाचा विषय तुमच्या बसचा नाही! ‘असे म्हणत या नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
आगामी विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत विजय मिळत विद्यापीठावर दबदबा असल्याचा दाखवून दिला आहे.. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवासेनेने आनंदोत्सव साजरा केला.
या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनीही ‘एक्स’ वर एक व्हिडीओ शेअर करत विरोधकांना चांगलंच फटकारलंय. ‘ बाप को हात लगानेसे पहले बेटेसे तो निपटले… आज सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेच्या 10 पैकी 10 जागा निवडून आल्यात, त्या सर्वांचं अभिनंदन. आणि भाजप, गद्दार टोळी या सगळ्यांच्या पोटात ( पराभवामुळे) दुखत असेल तर त्यासाठी एखादं औषध घेऊन टाका. हा ( सिनेट निवडणुकांचा निकाल ) तर पक्त ट्रेलर होता, विधानसभेच्या 288 जागांचा, खासकरून गद्दारांच्या जागेवर जो निकाल लागेल, तो पिक्चर महाराष्ट्र अजून पाहणार आहे ‘ अशा शब्दांत अयोध्या पौळ यांनी शिंदे गट, भाजपला चांगलच डिवचलंय.