राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अशातच आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.. मराठा (Marataha) आणि ओबीसी (Obc)आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण तापल असून महाराष्ट्रातील 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याचा इशाराच लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
यामध्ये रोहित पवारांसह राजेश टोपेंच्या नावाचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा फटका उमेदवारांना विधानसभेत बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ज्या नेत्यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange) पोसलं, त्यांच्या आंदोलनाला रसद दिली आणि ओबीसी आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केला अशा उमेदवारांना या निवडणुकीत आम्ही पाडणार असे त्यांनी म्हटले आहे.रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार आहोत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार आहेत. लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल असा इशारा त्यांनी दिला आहे.ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे. सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या कितीतरी वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा रखडलेला आहे.. तरुणांचे प्रश्न प्रलंबित आहेत . सरकारची शिंदे समिती बेकायदा समिती आहे. मराठा समाज गरीब असू शकतो, मात्र ओबीसी आरक्षणामुळे मराठा गरीब कसा असू शकतो? असा सवाल हाकेंनी केला. फडणवीस म्हणतात एक लाख रोजगार मराठा तरुणांना दिले आहे. मग एक लाख मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम एकनाथ शिंदे, रोहित पवार करत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. त्यामुळे येता विधानसभेत महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही चांगलाच आरक्षणाचा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.