राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्व राजकीय पक्षांनी मोर्शी बांधणी ला सुरुवात केली आहे. या निवडणुकीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद प्रतिवाद होत आहेत. अशातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ(Hasan musrif )यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar )यांच्या हल्लाबोल चढवला आहे. रोहित पवार छोटा बच्चा आहे त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, आपल्या वयाचे भान ठेवून त्यांनी बोललं पाहिजे असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा घटक पक्ष असलेला अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत अशी टीका देखील हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अजित पवारांची जागा सहजासहजी कोणालाही मिळत नाही त्यासाठी खूप खस्ता आणि कष्ट करावं लागतं असा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला तो या विधानसभेत दिसणार नाही..लोकसभेनंतर आम्ही जे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठा फरक दिसेल आणि महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येईल, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा राष्ट्रवादीच्या आहेत. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आमच्या चिन्हावर लढावं, अशी आमची विनंती आहे. आमच्या विनंतीला यश येईल असे दिसतं आहे. जागा वाटपामध्ये निवडून येणाऱ्याला प्राधान्य दिल पाहिजे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठे अंतर आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जोमाने मैदानात उतरले आहेत. शरद पवार साहेब हे माझे दैवत होते, आहेत आणि या पुढेही राहतील. मला पवारसाहेबांना माझ्याबद्दल अजिबात राग नाही. पण माझ्यावर ज्यांनी ही परिस्थिती आणली. त्यांना सोबत घेऊन पवारसाहेब फिरत आहेत. यावर माझा आक्षेप आहे, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.