राजमुद्रा : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता राजकीय पक्षांच्या प्रमाणे मतदारांच्याही मनात निर्माण झाली आहे. अशातच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे…
निवडणुकांच्या तारखांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 8ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. तर 10 ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही . दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला तयारी करावी लागेल. 13 ऑक्टोबरला रविवार आहे. 14 तारखेनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होऊ शक्यता आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआ (MVA) याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, महायुती (Mahayuti) या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.