राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते…या दरम्यानच आता शिवसेना ठाकरे गटाचं नवं गीत लॉन्च झाल आहे. असुरांचा सहार करण्यासाठी मशाल हाती दे हे गाण्याचे बोल असून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गोंधळ गीताचं अनावरण झालं असून त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना राज्यभरातील शिवसैनिकांना केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ हे गाणं ऑडिओ स्वरूपात आहे. प्रसिद्ध गायक नंदेश यांनी ‘मशाल’ हाती दे’ हे गाणं गायलं आहे. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. देवीला साकडं घालणारं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
मशाल हाती घे गाण्याचे बोल
दार उघड बये दार उघड
सत्वरी भुवरी ये गं अंबे
सत्वरी भुवरी ये…
आदिमाये तू ये, आदिशक्ती ये
आसूरांचा संहार करण्यासाठी
मशाल हाती दे
सत्वरी भूवरी ये गं अंबे…
उधे उधे उधे….
गोंधळ गीत !
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे.. सतवरी भूवरी ये ग अंबे.. सतवरी भूवरी ये..
दरम्यान उपस्थितानां संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले,आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. मी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो परंपरेप्रमाणे आपण दुसरा मिळवायला शिवाजी पार्कवर भेटणारच आहोत. तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.