राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना आता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त लागण्याची चिन्ह दिसत आहेत..राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी एकनाथ शिंदे गटाने महायुतीत आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ,पक्षाने त्यांच्या 5 इच्छुकांची नावे भाजप पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहे. यामध्ये अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत कोणाची वर्णी लागणार हे अद्याप समजलेले नाही..विधानसभेच्या तोंडावरच 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त साधल्या जात असल्याने त्यातून काय संदेश सरकारला द्यायचा हे स्पष्ट आहे.
दरम्यान महायुतीत असणाऱ्या शिंदे गटाने जी नावं पुढं केली आहेत, त्यात मनीषा कायंदे, रविंद्र पाठक, चंद्रकांत रघुवंशी, हेमंत पाटील आणि संजय मोरे या पाच जणांची नावं असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिकृतपणे अजून पक्षाने याविषयीची माहिती दिलेली नाही. लवकरच यासंबंधीचा निर्णय महायुतीमधील तीनही पक्ष जाहीर करू शकतात.
दरम्यान या राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांसाठी सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. या आमदारांमध्ये आपले सर्वाधिक आमदार असावेत यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते. भाजपने 6 जागांवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3-3 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये आता कोणाला किती जागा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या लोकसभेच्या नादावण्यात आलं त्यांचे तिकीट कापण्यात आलं, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कदाचित यात दिसून येणार आहे… तर ज्यांना महामंडळ देण्याचे आश्वासन देण्यात आले, त्यांची पण वर्णी लावण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक पण ज्यांना उमेदवारी देणे अडचणीचे आहे, त्यांची या आमदारकीवर बोळवण करण्यात येणार आहे.पण आता विधानसभेच्या तोंडावर ही नियुक्ती होण्याची चिन्ह दिसत आहेत.