राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का दिला आहे..इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम करत शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहेत. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे बडे नेते हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार आहे. ते भाजपचे कमळ सोडून तुतारी हाती घेणार आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओकला भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. परंतु हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला राष्ट्रवादीमधून विरोध होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे शरद पवार गटातील इंदापूरातील काही प्रमुख पदाधिकारी नाराज आहेत.दरम्यान त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केला आहे.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय घ्यायचा याचा विचार सुरू होता.. मात्र आता इंदापूरमध्ये जनतेची भूमिका महत्त्वाची आहे. गेली १० वर्ष जी माणसं आमच्यापाठी ठाम राहिली. त्यांना त्रास झाला. विकास कामांऐवजी अन्याय खूप झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी हा निर्णय घेतला आहे”, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले. लवकरच ते तुतारी हाती घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.