राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना जोमाने तयारीला लागले असून आज रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होणार आहे.. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला जाणार आहे.. याचा शोध सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जात असून सामंत यांच्याविरोधात दिला जाणारा उमेदवार हा पक्षातील आणि निष्ठावंत असावा अशी चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे.ठाकरेंच्या शिवसेनेकडून तिघेजण इच्छुक होते. पण, एका इच्छुकानं आता माघार घेतली आहे. त्यामुळेदोघेजण अद्याप रिंगणात आहेत.. ठाकरेंच्या शिवसेनेनं मंत्री सावंताविरुद्ध तगडा उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीने पाहायला मिळणार आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या होणाऱ्या बैठकीत उमेवारीबाबत चर्चा होणार आहे.. तसेच इतर पक्षातील उमेदवार दाखल झाल्यास त्याला मिळणारी मदत कशी असेल? त्यावर स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं म्हणणं काय? यावर देखील या बैठकीत ऊहापोह होणार आहे. त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची आहे. सामंत यांच्याविरोधात सक्षम उमेदवार म्हणून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या नावाची चर्चा आहे. तगडा चेहरा म्हणून बाळ माने यांना उद्धव ठाकरे रिंगणार उतरवणार असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे.
या मतदारसंघात इतर पक्षातील उमेदवार दिल्यास शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय असणार? यावर सध्या खल सुरू आहे. बाळ माने ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यास त्यांना ठाकरेंचे शिवसैनिक स्वीकारणार का? त्यांचा प्रचार करणार का? त्यांना माने यांचा प्रवेश मान्य आहे का? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.