राजमुद्रा : राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून येत्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे.. गेल्या लोकसभेत या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता.. त्यानंतर या विधानसभेतही पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.. महायुतिकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
बारामती मतदारसंघ हा अजित पवार यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र याच मतदारसंघात युगेंद्र पवार देखील काम करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते”, असा अंदाज अजित पवारांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित बारामती विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा ठरणार आहे..दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विकासाचा पाया ही वस्तूस्थिती आहे. पण शरद पवारांचा स्वभाव मी केलं, मी केलं हे सांगत फिरण्याचा नाही. शरद पवार यांनी बारामतीवर 60 वर्षे राज्य केलं, असे श्रीनिवास यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादीत बंड करून महायुतीस सामील झालेल्या अजित पवारांनी काही विषय भर सभेत न बोलता घरात बोलावेत असा सल्लाही त्यांनी अजित दादांना दिला.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत या बारामती मतदारसंघातनणंद आणि भावजय अशी लढत झाली होती. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. त्यानंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढत होणार असल्याचे बोललं जात आहे.यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. या अनुषंगाने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे