राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने मैदानात उतरले आहेत.. लोकसभेतील यशानंतर शरद पवार घरात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी धाव घेतली आहे.. त्यामुळे ते लवकरच तुतारी हाती घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
क्रॉस वेटिंगचा ठपका बसल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे आमदार खोसकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, या मतदारसंघामध्ये इच्छुकांची देखील गर्दी जमली आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर शरद पवारांच्या भेटीला आले असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार सोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.. तसेच त्यांच्यावरील सर्व आरोप चुकीचा असल्याचंही ते पवार यांना सांगणार आहेत.दरम्यान काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार असल्याची माहिती आहे.
आमदार हिरामण खोसकर आगामी विधानसभा साठी सध्या ते महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत चर्चा करत आहे. दरम्यान याआधीही त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती..महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून हिरामण खोसकर यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संधी देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह हिरामण खोसकर यांनी आधी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. आज पुन्हा एकदा ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.