राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इंदापूरमध्ये आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी शरद पवार, जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याआधी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.. ते म्हणाले, जनतेतून जो आवाज उठतो त्या प्रवाहासोबत राहणं ही लोकशाहीत महत्त्वाची बाब आहे. आज त्याचा आदर करुन हजारो जण इंदापूर तालुक्यातील आमच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहोत, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. तर पुत्र राजवर्धन पाटील यांनी भूमिका मांडली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून कार्यकर्त्यांची इच्छा भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे ही होती. कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळं उत्साह आहे. कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात जास्त आनंद होणार आहे, असं राजवर्धन पाटील म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. आज हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश शरद पवार गटात होणार असूनं त्यांची उमेदवारी निश्चित होणार का आहे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.. दरम्यान आज इंदापूर मधून ते तुतारी हाती घेणार असून ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंदापूरचा मतदारसंघ महायुतीत दुसऱ्या पक्षाला जात असल्यानं निवडणूक लढवता येत नसल्यानं जनता अन् कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजी पसरली.. यानंतर लोकांनी उठाव केला अन् हा निर्णय झाला, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.. त्यामुळे आज आम्ही सर्वजण शरद पवार गटात प्रवेश करणार आहोत, असे त्यांनी सांगितले