राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगणार असून महाविकास आघाडीकडून प्रत्येक मतदारसंघाची चाचणी करण्यात येत आहे.. या पार्श्वभूमीवरचं आता महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील विधानसभेच्या 18 जागांसाठी आघाडी कडून जोरदार मोर्चेबाधनी सुरू करण्यात आली आहे.. या बालेकिल्याला भेदण्यासाठी ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून मोठा मास्टर प्लॅन तयार केला आहे..
ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपची मोठी ताकद आहे. मात्र या मतदारसंघात ठाकरेंनी सर्वाधिक जागा जिंकून महायुतीचा किल्ला भेदावा, यासाठी प्लॅनिंग आखलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यात ठाकरे सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते पाच जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समाजवादी पक्षाला एक जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे महायुतीच्या बालेकिल्याला महाविकास आघाडी निवडणुकीत भेदणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.. या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडीने महायुतीला पाडण्यासाठी मोठा मास्टर प्लॅन तयार केला आहे..ठाण्यातील १८ विधानसभा जागांपैकी चार ते पाच जागांवर शरद पवार यांचे उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. कळवा-मुंब्रा, बेलापूर, उळ्हासनगर आणि शहापूर या चार जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यासाठी महाविकास आघाडीत एकमत झाले असून. ऐनवेळी मुरबाड मतदारसंघ शरद पवार यांना सोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला ठाण्यात विधानसभेसाठी फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व या तीन जागा काँग्रेसला सोडण्याविषयी चर्चा सुरु आहे..