राजमुद्रा : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजप आता चांगलाच अलर्ट मोडवर आला आहे.. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने राज्यात महाजन संपर्क अभियान सुरू केले असून या अभियानातून भाजप प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.. गेल्या काही महिन्यापूर्वी महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती.. या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेने घेतला.. त्यानंतर आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहिण’ योजनेनंतर आता भाजप नेते, डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘सक्षम भगिनी’ उपक्रमाची सुरुवात केली आहे.
या सक्षम भगिनीं उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या भव्य उपक्रमात सुमारे पाच हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे.या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले… त्यामुळे लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी ही मोठी आनंदाची वार्ता असणार आहे..
या उपक्रमांतर्गत महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.. तसेच शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनवण्यास मदत होईल, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.लाडक्या बहीण योजनेनंतर आता सक्षम बहिणी उपक्रमाचा काय परिणाम होतो, महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.