जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी आयुष व आयुर्वेद रुग्णालयातर्फे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच शरद घुगे, माजी पंचायत समिती सदस्य राजू सर, दिलीप चव्हाण, बंटी चव्हाण, नितीन पाटील, रघुनाथ पालवे, शुभम लाड, नाथाबाई गवळे, अनिल खडसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.