राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे..
आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तुतारी हाती घेतात या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. इंदापुरात धुमधडाक्यात हा प्रवेश सोहळा पार पडला.. या आगामी निवडणुकीत ते तुतारी हाती घेऊन निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी आम्ही देणार आहोत. तुम्ही इंदापूरकर हुशार आहात. मी वाळव्यावरून येथे तुम्हाला येऊन सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्यी गरज त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महत्त्व आमच्या पक्षात आहे. दरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे..
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी मोठे वक्तव्य केले. तुम्ही हर्षवर्धन यांना विधानसभेत पाठवा. मला निवडणूक लढायची नाही. मला १४ वेळा निवडून दिलं. मला स्वतसाठी काही नको. मला राज्याचा चेहरा बदलायचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार जोमाने मैदानात उतरले असून आगामी विधानसभेसाठी त्यांच्या पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. हर्षवर्धन पाटील यांनी आज त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे… आता ते लवकरच निवडणुकीच्या रिंगणात दिसून येणार आहेत… तर त्यांच्या या पक्षप्रवाशांन भाजपला खिंडार पडला आहे.