राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते..सोलापूरच्या होम मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार होता मात्र. पाचव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचे असे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्त्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे.. प्रशासनाच्या वतीने या सोहळ्यासाठी पूर्ण तयारी केली असताना त्यांचा हा दौरा रद्द झाल्याने पुन्हा याची वाट पहावी लागणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण, या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे, संपूर्ण जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आलेल्या आहेत.