मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यातील ३० साखर कारखान्याची चौकशी करावी अशा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटलांनी अमित शहा यांना लिहिले आहे. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या समोरील अडचण वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीन गडकरी यांच्या दोन कारखान्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे ‘भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपल्याच केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे का?’ याची राजकीय चर्चा रंगली आहे.
सातार्याच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीने चौकशी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये अशा प्रकारच्या लिलावातून कमी किमतीला खरेदी करण्यात आलेल्या राज्यातील ३० साखर कारखान्यांची चौकशी करण्याचे मागणी करण्यात आली आहे.