मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सभागृहात प्रचंड गदारोळ, गोंधळ झाल्यानंतर भाजपाचे बारा आमदार एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले असून यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचाही समावेश आहे.
त्यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सभागृहात आम्हाला सभापतींनी बोलू दिले नाही. त्यावरून हा गदारोळ झाला आहे. असे सांगून गिरीश महाजन म्हणाले “अध्यक्षांच्या दालनात आम्ही आमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अध्यक्षांनी आम्हाला बोलूच दिले नाही. आमचे म्हणणे ऐकून न घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने काही सदस्यांचा संयम सुटला.” ऐकून न घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच हा सदस्यांवर झालेला अन्याय आहे. त्यांना या विषयावर बोलू दिले नाही. आमच्या नेत्यांना देखील बोलू देण्यात आले नाही, असे सांगून आ. महाजन यांनी सांगितले की, “अध्यक्षांच्या दालनात आमच्या सदस्यांनी या विषयावरून बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे कुठल्याही प्रकारे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी या सरकारने केंद्र सरकारवर खोटेनाटे आरोप केले आहेत.” असे महाजन यांनी सांगितले.