राजमुद्रा : दसरा सण आणि विधानसभा निवडणूकीची पार्श्वभूमी असा मेळ घालत राज्यात आज राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे.दोन्ही नेते एकमेकांवर काय प्रत्यारोप करतात, काय टीका करतात हे आज संध्याकाळी स्पष्ट होईलत,पण त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘ आणखी थांबलो असतो तर आपली शिवसेना दिसली नसती. आपलं धनुष्यबाणही दिसलं नसतं ‘ असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दुसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दसरा मेळावा पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.. ते म्हणाले, गेल्या कोविडच्या काळात कोविडच्या नावाखाली सगळं बंद होतं, मंदिर बंद, सगळी काम बंद होती. त्या नावाखाली सण , उत्सव सगळं बंद होतं. पण आपलं सरकार आणण्याचं काम आम्हाला करावचं लागलं, कारण आणखी थांबलो असतो, तर ही शिवसेना तुम्हाला दिसली नसती, धनुष्यबाणही दिसला नसता तोच गहाण टाकलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी, तो सोडवण्यासाठी एवढं मोठं धाडस केलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून मविआचं सरकार स्थाप केलं, त्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य करत ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असं वारंवार म्हटलं जातं.. याचाही समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे..जो माझ्या लाडक्या बहीणींकडे,मुलींकडे वाकड्या नजरेने पाहील, अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. आमच्या सरकारमध्ये चुकीला माफी नाही. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे.