राजमुद्रा : विधानसभा निवडणुकांच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात तरीही नाशिक मध्य मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही.. या मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रसिखेच सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या मतदारसंघाचा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. याबाबत दोन वेळा चर्चा होऊनही खासदार राऊत यांनी या मतदारसंघाचा आग्रह सोडलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
महाविकास आघाडीच जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचा समजल असून यामध्ये नाशिक मध्य मतदार संघाचा विषय हा वादाचा ठरल्याच समोर आल आहे.. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच ठाकरे गटाचे संजय राऊत देखील आग्रही आहेत.महविकास आघाडीत या मतदारसंघावरून जोरदार ओढाताण होत आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार आणि माजी महापौर वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचा ठराव पक्षाने यापूर्वीच मंजूर केला आहे. तो वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात आला आहे. पक्षाची सबंध यंत्रणा त्या दृष्टीने तयारीला लागली आहे.
दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला नाशिक मध्य मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला अल्पसंख्याक मतांच्या बळावर सोपा वाटतोय.. या पक्षाकडे इच्छुकांची संख्याही भरपूर आहे. यामध्ये पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत.मात्र काँग्रेस पक्षाकडे प्रभावी उमेदवार नाही, असा शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. तसे न झाल्यास पक्षीय पातळीवर उमेदवारांची देवाण-घेवाण करण्याचा प्रस्ताव देखील शेवटच्या क्षणी चर्चेला येऊ शकतो. एकंदरच नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.
दरम्यान दुसरीकडे आता नाशिक मध्य मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा बनला आहे. विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावरून पैजा लागत आहेत. भाजपमध्ये सध्या अनेक इच्छुक तयार झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.