जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पूर्ण कालावधीत २३ मार्च २०२० पासून सर्व शाळा बंद आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्नही बंद आहे सर्व शिक्षण बंद असल्याने शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्यांना फी मागण्याचा तगादा लावतात. ही पिळवणूक शासनाने त्वरित थांबवावी आणि शालेय पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरसकट मी माफ करण्यात यावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे.
जिल्हाध्यक्ष भरत कर्डिले, प्रतिक जोशी, सुगत सैंदाणे, अजय पावरा, सीमा तायडे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. हे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. शासनाने वरील मागण्या मान्य न केल्यास युवा लोकसंघर्ष मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.