राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपच्या फेरी झडत आहेत..
काल सत्तेतील असलेले नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांची हत्या करण्यात आली.सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर गोळीबार होतोय. या परिस्थितीत सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली आहे.. आत्ताच सरकार हे गद्दारांचा पंचनामा आहे.. ही गद्दारी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षासोबत नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्र सोबत झाली असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी चढवला.आम्ही जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी कायम लढतच राहू, महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. किंबहुना, शाहू,फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी-शाहांचा कधीही होऊ देणार नाही, असा घनाघात उद्धव ठाकरेंनी चढवला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे सरकार घोषणांचा पाऊस वाढत आहे.. जनतेची फसवणूक करत आहे…सिने-अभिनेते घेऊन मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. हा सर्व पैसा कुणापासून वसूल करण्यात येतो आहे. जो काही पैसा या जाहिरातींवर खर्च करत आहात तेवढाच पैसा जर का जनतेच्या सुरक्षिततेसाठी केला असता तर या घटना घडल्या नसत्या. या सर्व प्रकरणावर आम्ही वेळोवेळी बोलूच.. जनता या पूर्ण प्रकरणाचा योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करेल, असा आम्हाला विश्वास आहे.. त्यामुळे जनतेसाठी आम्ही सदैव उभे राहू असे ठामपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितल.
आपल्या राज्यात वारंवार महिला अत्याचार, हत्याकांडाच्या घटना घडत असतात त्यावेळी सदैव तत्पर असणारे पोलीस जनतेचे रक्षक आहेत. सुरक्षा त्यांच्यासाठी वापरली जावी. या पद्धतीने जर का महाराष्ट्राच्या नेत्यांवर हल्ला होतं असेल, महिलांवर अत्याचार होत असेल. तर हे गंभीर आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.. दरम्यान विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटना यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे..