राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून यात आता तिसऱ्या आघाडीतून वेगळी चुल मांडण्याच्या विचारात असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू महायुतीला सोडून रिंगणात उतरले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 6 विधानसभेवर बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janshakti Party) उमेदवार देणार असून या जिल्ह्यात निवडणुकीसाठी त्यांच नशीब आजमावणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
या विधानसभेसाठी प्रहारचें सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण,अक्कलकोट,पंढरपूर – मंगळवेढा आणि करमाळा या जागांवर ‘ उमेदवार रिंगणात असतील, अशी माहिती आहे. मुस्लिम समाजाला उमेदवारी देणार असल्याचे प्रहारकडून सांगण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटक अजित कुलकर्णी यांनी ही दिली माहिती दिली.परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या बॅनरखाली प्रहार तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात 6 जागा लढणार आहेत.
महायुती सरकारला कधी इशारा तर कधी कानपिचक्या देत बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळी चूल मांडण्याचेही संकेत दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी या सहा जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीचीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. तिसऱ्या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह आदी काही नेत्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यातील 11 मतदारसंघांतून तब्बल 72 जणांना वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे या 11 मतदारसंघात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान सहा मतदारसंघात प्रहार चे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत..