राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर आली असून निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यासाठी आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे.या बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
आगामी विधानसभाच्या अनुषंगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात देखील दाखल झाले आहेत.
दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद होणार असून आज विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीत होणारे या बैठकीत तिढा सुटणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान दुसरीकडे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच टोल नाक्यावर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलनाकीचा निर्णय घेतला आहे.. या विधानसभेच्या तोंडावर महायुती घोषणांचा पाऊस पडत असल्यास वारंवार विरोधकांकडून बोलले जात असतं..