राजमुद्रा : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारख्या नुकत्या जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचं रणशिंग फुकलं असून यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत असल्याने दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असणार असून २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.