राजमुद्रा : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानुसार ठाकरे गटाने ही शिंदे गटाच्या विरोधात पर्याय शोधण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) पाचोरा तालुक्याचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील (MLA Kishore Pati) यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi)विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे..त्यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून जाहीर होण्याची देखील शक्यता आहे.
पाचोर्याचे विद्यमान शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासाठी विधानसभा निवडणूक पाहिजे तितकी सोपी नाही, पाचोरा भडगाव मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने किशोर पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली, निधी देखील मोठ्या प्रमाणात आणला आहे..मात्र तरी देखील राजकीय संघर्ष त्यांना करावा लागत आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण परिवार ज्या ताकतीने आमदार किशोर पाटील यांच्या सोबत असायचा त्याच परिवारात राजकीय फूट पडली असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक पाहिजे तितकी सोपी नाही हे तेवढेच खरं आहे. मात्र मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या भरोशावर निवडणुकींला सामोरे जात असल्याचा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
माजी आमदार आ.रो.पाटील हे किशोर पाटील यांचे काका, त्यांनीच मला राजकारणात आणलं असे किशोर पाटील अनेक वेळा खुल्या व्यासपीठावर बोलून दाखवतात. पोलिसात भरती झाल्यानंतर काही वर्ष कार्यरत असताना काकांनीच मला खाकीचा राजीनामा देऊन राजकारणात यायला सांगितलं, घरातूनच राजकीय बाळकडू मिळाल्याने शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाभरात संघटनात्मक कार्य केले, या सर्व कार्याची दखल घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभेची संधी दिली त्यात विजयी झालो, हे सगळं काकांच्या आणि जनतेच्या आशीर्वादामुळे शक्य झालं असं आमदार किशोर पाटील नेहमी सांगतात.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत सर्वात पहिल्या फळीमध्ये जाणारे आमदार म्हणून किशोर पाटील यांचं नाव सर्वाधिक राज्यभरात चर्चेत आल, एकनाथ शिंदेंचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून शिंदे गटात त्यांची ओळख आहे. मात्र शिवसेनेत पडलेल्या फोटोमुळे मोठ्या प्रमाणात किशोर पाटील यांना स्वतःच्या होमपीच वर मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला. गद्दारीचा आरोप होत असताना किशोर पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून बहिण असलेल्या वैशाली सूर्यवंशी या राजकीय संघर्षात उभ्या टाकल्या गेल्या , माजी आमदार आ.रो पाटील यांच्या कन्या असलेल्या वैशाली सूर्यवंशी यांनी भाऊ असलेल्या विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध विधानसभेच्या रिंगणात दिसणार आहेत..
घरातच राजकीय फूट पडल्यामुळे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्यासाठी हे निवडणूक गेल्या काळासारखे सोपे नाही कारण यामध्ये काकांचे राजकीय मार्गदर्शन त्यासोबत निर्मल फूड ची असलेली खाजगी यंत्रणा दमतीला असायचे ती आता नाही, त्यामुळे किशोर पाटील यांना एकांकी झुंज विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने द्यावी लागणार आहे.
या निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपाचे अमोल शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चंग बांधल्यामुळे महायुतीतील अंतर्गत विरोधाचा देखील सामना किशोर पाटील यांना करावा लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काही फरकाने किशोर पाटील यांच्या विरुद्ध अमोल शिंदे यांचा पराभव झाला होता मात्र पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा दावा भाजपाच्या अमोल शिंदे यांनी केला आहे. या सर्व राजकीय संघर्षात नेमका किशोर पाटील यांना कितपत यश मिळत ? हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या 23 नोव्हेंबर रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.