राजमुद्रा : जळगाव शहरातील कांचन नगर येथे आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी जळगाव गर्जना जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ सोनवणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गर्जना संघटक व माजी सभापती राजेंद्र चौधरी तसेच रोतवद गर्जना विभाग प्रमुखाचे कैलास भाऊ दांडगे,गर्जना शहर संघटक संजयजी भाटिया, कांचन नगर गर्जना शाखाप्रमुख सचिन भाऊ सोनवणे, दिनकर नगर गर्जनाप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे, मनोज भाऊ सोनवणे, विनोद भाऊ कदम,किरण भाऊ सपके, जगदीश चौधरी,विनोद सोनवणे, संतोष तायडे,संजू भाऊ कोळी,रूपेश सपकाळे या परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते
यावेळी अध्यक्षस्थानी असलेले सुभाष भाऊ सोनवणे यांनी राज्य शासनाने व केंद्र शासनाने कोळी समाजावरील आरक्षणासंदर्भातील अन्याय दूर करावा व महर्षी वाल्मीक रुषी जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या.