राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची माहिती समोर आली आहे..मातोश्रीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या 13 विद्यमान आमदारांची उमेदवारांची तसंच आणखी 6 जणांची उमेदवारी निश्चित मानली तर 3 विद्यमान आमदारांना बच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी ठरली?
1.आदित्य ठाकरे, वरळी
2.सुनील प्रभू, दिंडोशी
3.रमेश कोरगांवकर, भांडूप
4.सुनील राऊत, विक्रोळी
5.राजन साळवी, राजापूर
6.ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व
7.संजय पोतनीस, कलिना
8.कैलास पाटील, धाराशीव
9.भास्कर जाधव, गुहागर
10.शंकरराव गडाख, नेवासा
11.वैभव नाईक, कुडाळ
12.नितीन देशमुख, बाळापूर(अकोला)
13.राहुल पाटील, परभणी
यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित
1. स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
2. सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
3. अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
4. नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
5. अनिल कदम – निफाड
6. मनोहर भोईर – उरण
तर ‘या’ तीन विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात?
1. अजय चौधरी,शिवडी
2.उदयसिंग राजपूत,कन्नड,संभाजीनगर
3.प्रकाश फातर्पेकर,चेंबूर
दरम्यान दुसरीकडे विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज मोठी इनकमिंग होणार आहे.. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपलाही उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार आहेत.. भाजपचे राजन तेली हे आज संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार आहेत.. तर सांगोल्यातून राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखेही आज मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत..