राजमुद्रा : जळगाव येथील बालगृहात दाखल झालेल्या सहा बालकांच्या पालकांचा शोध जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत घेण्यात येत असून, पालक, नातेवाईक, माहितगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव येथील मुला-मुलींचे बालगृहात दाखल बालके 1) मुस्कान अनिस अली (दाखल २३ जून, २०२३ रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळून आली, 2) अफसाना राजू पठाण दाखल 2 मे, 2023 रोजी सुरत रेल्वे चाईल्ड लाईनला सुरत येथे बेवारस अवस्थेत आढळून आली, बालिका जळगाव जिल्ह्यातील असल्याने सुरतहून जळगाव येथे लोकेशनवर दाखल, 3) राधा देवा गायकवाड 4) रेश्मा देवा गायकवाड 5) अर्जुन देवा गायकवाड 6) करण देवा गायकवाड. हि बालके अमळनेर पोलिस स्टेशन मार्फत 28 जुलै, 2022 रोजी बालगृहात दाखल झाली आहेत,
हि बालके जिल्हा महिला व बाल विकास काळजी आणि संरक्षणासाठी बालगृहात दाखल आहेत. या मुलांच्या पालक, नातेवाईक, व माहितगारांनी आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी बाल संरक्षण कक्ष जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.- ७३५०४१४७६८) तसेच मुला- मुलींचे बालगृह जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.८३०८४६२५९२) या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे