राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं असून जळगावात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्या महायुतीत बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांच्यावर हल्लाबोल चढवत युती धर्माची आठवण करून दिलीय.. ते म्हणाले, महायुतीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष सहभागी असल्याने इच्छुकांना त्यांच्या इच्छेनुसार पक्षातून अधिकृत उमेदवारी देताना पक्षालां अडचणी येतात..अशातच नाराज झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारासाठी बंडखोरी करतात.मात्र महायुती सोबत बंडखोरी करण हा त्यावर पर्याय नाही, असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, पाच वर्षे जो पक्षासाठी परिश्रम घेतो आणि त्याला उमेदवारी मिळाल नाही तर तो नाराज होऊन तो बंडखोरी करतो.. मात्र त्याचे बंडखोरीमुळे पाच वर्षाची मेहनत वाया जाते.. त्यामुळे आज ना उद्या आपलं राजकीय स्थान बसू शकतो या उद्देशाने त्यांनी बंडखोरी करणा हा पर्याय टाळायला पाहिजे.. असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले..
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी फिल्डिंग लावली असल्याची माहिती समोर आली आहे..