राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्त्वाची बैठक ठाण्यामध्ये पार पडली.. या बैठकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच मनसेचे राज ठाकरेही उपस्थित होते, या बैठकीमध्ये मनसेला विधानसभेसाठी महायुतीमध्ये सामील करून घेण्याबाबत चर्चा झाली.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता.. त्यांच्या या पाठिंबामुळे महायुतीला काही फायदा झाला का याबाबत महायुतीतितील तिन्ही पक्षांनी अद्याप काही सांगितले नाही.. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेला पुन्हा एकदा आपल्या सोबत घेण्यासाठी महायुतीने हालचाल सुरू केली आहे. दरम्यान आता या पाठिंब्याची परतफेड महायुती मनसेला पाठिंबा देऊन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकतीच महायुतीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. अद्याप महायुतीत काही जागांचा तिढा असून तो सुटल्यानंतर महायुतीचा फॉर्म्युला स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.
. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.