राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून या मतदारसंघात सातव्यांदा मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.. यावर बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, भाजपच्या सर्व नेत्यांचं, केंद्रीय नेतृत्वाचं मला उमेदवारी दिल्याबद्दल मी आभार मानतो..त्यांनी मला जवळपाससातव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की संपूर्ण राज्यामध्ये रेकॉर्डब्रेक अशी मत मला या मतदारसंघांमध्ये मिळणार असं त्यांनी म्हटले आहे.
तसेच जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे..मात्र या ठिकाणी आम्ही दुसरी कोणाचीही जागा निवडून येऊ देणार नाही.. या विधानसभा निवडणुकीत मलकापूर आणि जळगाव जिल्ह्यातल्या 11 अशा बाराच्या बारा जागा आम्ही निवडून आणू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.. या विधानसभा निवडणुकीत कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी आणि दक्षता ही आम्ही घेऊ मात्र सर्वांनी युतीधर्म पाळावा, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून यात सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांना थांबविण्यासाठी शरद पवारांकडून राजकीय खेळी करत भाजपचे एकेकाचे निष्ठावान कार्यकर्ते दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान या मतदारसंघात सातव्यांदा उमेदवारी दिल्यामुळे लोकांचा प्रचंड प्रेम मिळत असून यावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक मते मला मिळतील असा विश्वास देखील मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. माझ्या विरोधात त्यांना उमेदवार आयात करावा लागला अशी टीका देखील त्यांनी केली आहे.