राजमुद्रा : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. मात्र ही यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार यांनी उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॉर्म चे वाटप केले आहे..कोणत्याही क्षणी आता अजित पवार गटाकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडून आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यामध्ये 1. संजय बनसोडे 2. चेतन तुपे 3. सुनील टिंगरे 4. दिलीप वळसे पाटील 5. दौलत दरोडा 6. राजेश पाटील 7. दत्तात्रय भरणे 8. आशुतोष काळे 9. हिरामण खोसकर 10. नरहरी झिरवळ 11. छगन भुजबळ 12. भरत गावित 13. बाबासाहेब पाटील 14. अतुल बेनके 15. नितीन पवार 16. इंद्रनील नाईक 17. बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपची पहिली यादी जाहीर होताच काही ठिकाणी ज्या इच्छूकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये नाराजी दिसून आली. 99 जागांपैकी एकूण 13 मतदारसंघात भाजपकडून महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील हालचालींना वेग आला असून, दोन्ही पक्षांकडून कोणत्याही क्षणी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील दत्तात्रय भरणे संजय बनसोडे अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.