राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले असून नुकताच त्यांचा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना मेळावा पार पडला.. यावरून बोलताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा चांगला समाचार घेतला आहे..मुख्यमंत्र्याना या मुक्ताईनगर मतदार संघात यावे लागते या वरून समजावे कोणाचा बालेकिल्ला आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला..
याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनावर भाषण करत आहेत..मात्र महागाई वर बोलत नाहीयेत, शेतकरी शेतमजूर यावर बोलत नाहीत. सरकारने आजपर्यंत ५ हजार कोटींचे काम केलीत असे मुख्यमंत्री सांगून गेली ही थाप आहे, पैसा कुठे जिरला त्याचा चौकशी केली पाहिजे,, असे म्हणत खडसेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.. सत्ताधारी वारंवार विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर बोलत होते.. विरोधकांनी योजना बंद होईल असा प्रचार केला नाही मात्र हे स्वतः काही तरी बोलून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले..
तसेच ते पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीला माहित आहेत लोकसभेला रक्षा खडसे यांचे काम केले नाही..आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाने ठरवले पाहिजे की महायुतीला विरोध करणाऱ्या गद्दाराना मतदान न करण्याची गरज आहे• आज चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पण कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार हे त्यांनी सांगितलं नाही.. विधानसभेच्या तोंडावर मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस हे सरकार पाडत असल्याच सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. दरम्यान महाविकास आघाडीत मोजक्या जागांचा तिढा आहे तोही लवकरच सुटेल, असेही ते म्हणाले.