राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर करण्यात येत आहेत. अशातच भाजपकडून धुळे मतदार संघात अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी पक्षाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले की, धुळे शहरात गत विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची संख्या ७० ते ७५ हजार होती. आता १ लाख १५ हजार मतदार झाले आहेत. दर पंचवार्षिकला अशाच पध्दतीने त्यांची मतदार संख्या वाढत राहिली तर १५ वर्षात त्यांचे तीन लाख मतदार होतील आणि धुळे शहराचे दूसरे मालेगाव होईल. त्यामुळे आज आपल्याला ही शेवटची संधी मिळाली आहे. असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पुढील निवडणुकांमध्ये अशी संधी आपल्याला मिळेलच याची शाश्वती नाही. भाजप व युती म्हणून काम केले तर आपण निश्चितच अधिक मताधिक्क्याने जिंकू, मतदानापुर्वी मुस्लिमांचा फतवा निघतो आणि एका उमेदवाराला एकगड्डा मतदान होते. परंतु, आपल्याला मतविभाजनाचा फटका बसतो. हे थांबविण्याचा प्रयत्न आपल्या प्रत्येकाला करावा लागेल. विशेषत बुथ प्रमुख, मंडल अध्यक्षांना अॅक्टीव व्हावे लागेल. घरी बसून काम न करताना प्रत्येकाने घरोघरी फिरण्याची तयारी ठेवावी. मतदान यादी सर्वांना दिलेली आहे. २९ किंवा ३० तारखेला मतदार यादी अंतिम होईल. त्यानंतर ५ तारखेपासून आपण घरोघरी जावून स्लिप वाटप सुरु करु. त्यासाठी आपण मशीन आणल्या आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान येत्या २४ तारखेला सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. मनोहर चित्र मंदिराजवळील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे २४ तारखेला सर्वांनी उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी. कोणीही गाफील राहू नका, आपल्याला मोठी लढाई जिंकायची आहे, असे आवाहनही अनुप अग्रवाल यांनी यावेळी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील धुळे शहर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून होतं..महायुतीमध्ये धुळ्याची जागा शिंदे गटाला सुटणार की भाजपला याची उत्सुकता ही ताणली गेली होती.. अखेर भारतीय जनता पक्षाकडून अनुप अग्रवाल यांचा तिकीट जाहीर होताचं धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला.