राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक मालेगाव रोडवरील अनुप अग्रवाल यांच्या वॉररुमध्ये आज सकाळी पार पडली. या बैठकीत 24 तारखेला भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने त्यावर चर्चा करण्यात आली.
दरम्यान यावेळी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले मतभेद विसरावेत. निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धा आता संपली आहे. पक्ष शेवटी कोणाला एकालाच तिकीट देतो. त्यामुळे आपल्यातील मतभेद विसरुन सर्वांनी जोमाने कामाला लागावे. अनुपभैय्यांना 50 हजारांहुन अधिक मताधिक्क्यांनी भाजपेयी निवडून आणतील असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केला.
या बैठकीला माजीमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आ. राजवर्धन कदमबांडे, गुजरातचे मुकेशभाई पटेल, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, महादेव परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, नागसेन बोरसे, भिकन वराडे, सुनील बैसाणे, राकेश कुलेवार, चेतन मंडोरे, शीतल नवले, कल्याणी अंपळकर, सुरेखा उगले, प्रवीण अग्रवाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. दरम्यान या आधीच्या लोकसभेप्रमाणे आता भाजपा कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वास ठेऊ नये. या अतिपायी आपण लोकसभा घालवली. एकटे मालेगाव सेंट्रल आपल्यावर भारी पडले, याची सल लोकसभेत मतदान न करणार्या धुळेकर जनतेलादेखील आहे. त्यामुळे यावेळी 45 टक्के नव्हे तर 70 टक्क्यांहून अधिक धुळेकर जनता मतदान करेल. अनुप अग्रवाल हे निवडून येतीलच, असा विश्वास डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. 24 तारखेला अनुपभैय्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यानिमित्ताने भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्याचे आवाहनही डॉ. भामरे यांनी केले.
मालेगाव न होऊ देण्याची शेवटची संधी ःअनुपभैय्या अग्रवाल
मालेगाव न होवू देण्याची धुळेकरांना विधानसभेच्यानिमित्ताने शेवटची संधी चालून आली आहे. गेल्या पाच वर्षात ‘त्यांची‘ मतांची संख्या लक्षणिय झाली असल्याचा दावा भाजपाचे धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी केला आहे. अनुप अग्रवाल म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत फारूक शाह हे निवडून आले. त्याचे 70 ते 75 हजार मतदान होते. आज त्यांच्या मतदानाचा आकडा 1 लाख 15 हजारावर आहे. पाच वर्षात तब्बल 40 ते 45 हजार मतदान वाढू शकत नाही. मात्र तो वाढला आहे. निवडणूकीच्या तोंडावर त्यांचा फतवा देखील निघतो. आपल्यात तसा प्रकार होत नाही. जर पाच वर्षात 1 लाख 15 हजारावर त्यांचे मतदान जावू शकते तर मग ही संधी गेली तर पुढच्या पाच वर्षात हीच संख्या 1 लाख 70 हजारापर्यंत जाईल आणि धुळे हे मालेगाव होईल. त्यामुळे हे कोणीच रोखु शकणार नाही. म्हणूनच आज आपल्या सर्वांना ही शेवटीच संधी मिळाली आहे. सर्वांनी प्रामाणिक आणि मनापासून काम केले पाहिजे. 2014 मध्ये महायुती तुटल्यानंतर पहिल्यांदाच भाजपाला धुळे शहराची जागा मिळाली आहे. त्यामुळे ही संधी गेली तर पुढच्या निवडणूकीत भाजपाला ही संधी मिळले की नाही हे सांगता येणार नाही. एकत्र राहुण आपण काम केले आणि अनुप अग्रवाल हा विषय बाजुला ठेवून भारतीय जनता पार्टी या विचाराने व युती म्हणून जर आपण काम केले तर ही जागा आपण निश्चितच चांगल्या मतांनी जिंकु असेही अग्रवाल म्हणाले.
हिंदू राष्ट्रसाठी भैय्यांना विजयी करा ःगजूशेठ
हिंदु राष्ट्रासाठी धुळे विधानसभेचे भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केले. आपल्याकडे युवा आघाडीसह सर्वच आघाड्यांचे संघटन मजबुत आहेत. 51 नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाने फक्त आपल्या प्रभागावरच लक्ष्य केंद्रीत करावे. जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर काढावेत. कोणीही अती आत्मविश्वास बाळगू नये. लोकसभेसारखी चुक करू नका, अशा सुचनाही अंपळकर यांनी केल्या.