राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा आमदार रिपीट न करणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो . याच विधानसभेमध्ये आता महायुती मधून गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी केलेल्या माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष लढण्याबाबत दंड थोपटले आहे.त्यामुळे अमळनेर विधानसभेचा गड नेमका कोण राखणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे तिकीट घेऊन चूक झाली ती चूक पुन्हा आता यापुढे होणार नाही म्हणूनच अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जाहीर केले आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत अमळनेर विधानसभेमध्ये विजय होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा मराठा भाऊला आहे,,मात्र अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे मराठा समाज आणि अल्पसंख्याक समाजाची मोठी ताकद या मतदारसंघात आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या निमित्ताने जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा विधानसभेच्या सभागृहात जाणार असल्याचा विश्वास माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी विधानसभेमध्ये अपयश आले तरी देखील सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिला कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर जनतेची सेवा केली, आगामी विधानसभेच्या निमित्ताने जनतेचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असल्याचा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मंत्री अनिल पाटील यांच्यापुढे कळव आव्हान उभे राहिले आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात भरघोस निधी जरी उपलब्ध झाला असला तरी प्रत्यक्षात अद्याप पर्यंत कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे आगामी काळ मंत्री अनिल पाटील यांच्यापुढे कळवा आव्हान उभे करणारा आहे. मंत्र अनिल पाटील यांना अमळनेर विधानसभा पुन्हा एकदा पिंजून काढावा लागणार आहे. मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात यापूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मंत्री अनिल पाटील यांचा पराभव केला आहे त्यामुळे अमळनेर विधानसभेचा गड नेमका कोण राखणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.