राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे..तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे.. पार्श्वभूमीवरच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 45 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत..
मनसेची दुसरी यादी
कल्याण ग्रामीण- प्रमोद (राजू) पाटील,
माहिम- अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम – शिरीश सावंत
वरळी- संदीप देशपांडे
ठाणे शहर – अविनाश जाधव
मुरबाड – संगीता चेंदवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर- साईनाथ बाबर
खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे
मागठाणे – नयन कदम
बोरिवली – कुणाल माईनकर
दहिसर – राजेश येरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सोवा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व – महेश फरकासे
गोरेगाव – विरेंद्र जाधव
चारकोप – दिनेश सावळी
जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
विक्रोळी – विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे
मनसेने जाहीर केलेल्या या उमेदवारांच्या यादीत दोन महिला उमेदवारांना ही संधी देण्यात आली आहे.. या यादीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगीता चेंदवणकर तर गेवराई विधानसभा मतदारसंघातून मयुरी बाळासाहेब मस्के यांना उमेदवारी देण्यात आले आहे.. दरम्यान या 45 उमेदवारांच्या यादीत त्यांनी राजपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे..
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीच्या पहिल्या यादीत बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.