राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत.. नुकतीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली असून या यादीत 38 जणांच्या नावाची वर्णी लागली आहे….या यादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये बारामती मधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- मुश्रीफ
अहेरी- अत्राम
इंदापूर- दत्ता भरणे
अमळनेर- अनिल भाईदास पाटील
मावळ- सुनिल शेळके
इगतपुरी – हिरामण खोसकर
परळी – धनंजय मुंडे
दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवाराचा सामना रंगणार आहे.