राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदार संघाचा उमेदवारीचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.. या मतदारसंघातून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. त्यानंतर आता या जागेसाठी आग्रही असणारे भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या भूमीकेकडे लक्ष लागला आहे.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांची चढाओढ सुरु होती.. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे… दरम्यान येत्या 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. जगदीश मुळीक यांच्यासह सर्वांची भेट घेणार आहे. ते जेष्ठ नेते आहेत, असंही सुनील टिंगरे यांनी म्हटलं आहे..
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी
तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके