जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर काही दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या राष्ट्रवादीचा एक बडा नेत्याच्या जावयाला ईडी च्या पथकाने अटक केल्याने सर्वत्र राज्यात खळबळ उडाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्यांची बेकायदा भूखंड खरेदी प्रकरणात चौकशी सुरू आहे मात्र त्या नेत्याच्या जावयाला ईडीने चौकशी कामी अटक केल्याने त्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
त्या बड्या नेत्यांसह जावई व पत्नी ला देखील ईडीची नोटीस बजावल्याचे खळबळजनक वृत्त राजमुद्रा च्या हाती लागले आहे. या संदर्भात अधिकृत माहिती घेतली असता मुंबईतील एका बड्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याच्या संपर्कात असलेले काही पदाधिकारी कार्यकर्ते तसेच व्यवसायात भागीदारी असलेल्यांची ईडी चौकशी करणार आहे.
राज्यात बेकायदा जमवलेली बेकायदेशीर संपत्ती व मालमत्ता प्रकरणी राष्ट्रवादीचे तसेच कॉग्रेस व शिवसेनेचे बडे नेते ईडी च्या रडारवर आहे. ईडी चे स्वतंत्र पथक देखील राज्यात तळ टोकून आहे जे नेते ईडीच्या रडारवर आहेत त्या नेत्यांची महत्वपूर्ण माहिती जमवण्याचे काम ईडीची गुप्तचर यंत्रणा करीत आहे