जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नंतर काही दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी ने अटक केली मात्र आणखी काही महत्वपूर्ण चौकशी कामी ईडी दुसरे पथक जळगावात दाखल होणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. ईडी चे पथक कुठल्याही क्षणी जळगाव जिल्ह्यात धडकणार आहे आणखी काही धागेदोरे जुळतात का ? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या बँक खात्यातून काही आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडी च्या चौकशी मधून समोर आले आहे गिरीश चौधरी यांच्या बँक खात्याचे थेट कनेक्शन भोसरी भूखंडाशी जुळल्यामुळे खडसे यांच्या जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या परिवारात ईडी च्या पथकाने कार्यवाही केल्याने सर्वत्र राज्यात खळबळ उडाली आहे.