राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहेत. अशातच आता काँग्रेसने रात्री उशिरा आपल्या 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.. या यादीत नांदेड दक्षिण मधून पुन्हा आमदार मोहन हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर झाले आहे तर मुखेड मतदार संघातून माजी आमदार हनुमंत पाटील यांना संधी दिली आहे.. तर चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेसने शिरीष कोतवाल येणार आहे..
काँग्रस पक्षाची तिसरी उमेदवार यादी
१. खामगाव – राणा सनाडा
२. मेळघाट – डॉ. हेमंत चिमोटे
३. गडचिरोली – मनोहर पोरेती
४. दिग्रस – माणिकराव ठाकरे
५. नांदेड दक्षिण – मोहनराव अंमबाडे
६. देगलूर – निवृत्तीराव कांबळे
७. मुखेड – हेमंतराव पाटील – बेतमोगरेकर
८. मालेगाव मध्य – इजाज अजिज बेग
९. चांदवड – शिरीशकुमार कोतवाल
१०. इगतपुरी – लाकीभाऊ जाधव
११. भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे
१२. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
१३. वांद्रे पश्चिम – असिफ जकारिया
१४. तुळजापूर – कुलदीप कदम पाटील
१५. कोल्हापूर उत्तर – राजेश लातकर
१६. सांगली – पृथ्वीराज पाटील
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे..महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.