राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या असताना माही मतदारसंघात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.. या मतदारसंघातून सदा सरवणकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले आहे.. दुसरीकडे याच मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.. मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी महायुती पुढे सरसावली आहे..सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चा जरी सगळीकडे रंगल्या असल्या तरी अशातच सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या व्हॉट्सअँप स्टेटसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.यात ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच दिसून आला आहे..त्यामुळे सदा सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या माहीम मतदारसंघातून. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकर उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. आता त्यांची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलण्याची माहिती समोर आली आहे.
समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर आता माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचे बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकरशिवेसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सअँप स्टेटस वर ठेवलं असून उद्या म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे.