चोपडा राजमुद्रा : विधानसभेच्या महाविकास आघाडी मशाल या चिन्हावर अधिकृत उमेदवारी प्रभाकर गोटू सोनवणे यांना जाहीर झाली आहे. मातोश्री इथे पक्षप्रवेश करित प्रभाकर गोटू सोनवणे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते ए बी फॉर्म स्वीकारला आहे.
भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गिरीश महाजन यांच्याने निटवर्ती असलेले प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झालेले आहे. भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. कोळी समाजाचा मोठा चेहरा म्हणून प्रभाकर गोटू सोनवणे यांच्याकडे पाहिले जात होते मात्र अखेर चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीं वेळेस प्रभाकर गोटू यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये जात भाजपाला धक्का दिला आहे.
भाजप सह महायुतीला मोठा धक्का यामुळे मानला जात आहे कारण या ठिकाणी महायुतीकडून माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आले आहे चंद्रकांत सोनवणे देखील कोळी समाजातून येतात, महाविकास आघाडीकडून भाजपमधूनच इच्छुक असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आल्याने चोपडा विधानसभेची निवडणूक अधिक रंगत होणार आहे.
कोळी समाजाचा व मराठा समाजाचा प्राबल्य असणाऱ्या चोपडा विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय डिव्हायडेशन यानिमित्ताने होणार आहे. ठाकरे गटाने सावध पवित्रा घेत उमेदवारांची चाचणी करीत असतानाच भाजपाचा व मंत्री गिरीश महाजन यांचे शिलेदार असलेले प्रभाकर गोटू सोनवणे यांना गळाला लावले आहे, त्यासोबतच महायुतीविरुद्ध उमेदवारी देखील देऊ केली आहे.