राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या अंतिम याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. आज निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.. अशातच आता मोहोळ मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे.. उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारच बदलला आहे. या मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती.. मात्र त्यांच्या ऐवजी आता राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे..
राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाकडून मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली होती.. मात्र त्यांच्या उमेदवाराने नाराजी पसरली.. ही उमेदवारी बदलण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी शरद पवारांची भेटी घेतली होती..यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्रदेखील दिले आहे.अखेर सिद्धी यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान आता मोहोळ मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे राजू खरे हे निवडणूक लढवणार असून त्यांचा सामना यशवंत माने यांच्याशी होणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे..