राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा असा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांची उमेदवार जोरदार शक्तीवर्धन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आणखी 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पंढरपूर मधून अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे.. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भलके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणारच असल्याचे दिसून येत आहे..
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पाचवी यादी
माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुलुंड मधून संगीता वाजे, मोर्शी येथून गिरीश कराळे, पंढरपूर येथून अनिल सावंत आणि मोहोळ येथून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर 26 तारखेला 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर रोजी 7 उमेदवारांच्या नावांची चौथी यादी जाहीर केली होती. यानंतर आज आणखी 5 उमेदवारांच्या नावाची पाचवी यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.