राजमुद्रा : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांकडून अंतिम याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. तर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी खेळी खेळली आहे..मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.. थोड्याच वेळा ती आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत..
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या उमेदवारीची निश्चितता नव्हती..त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप असल्याच्या कारणामुळे शिवसेना आणि भाजपकडून मलिकांच्या उमेदवारीला विरोध होता. तरी देखील अजित पवारांनी मलिकांना अखेर उमेदवारी दिल्याचं कळतं आहे. मलिकांकडे एबी फॉर्मदेखील पोहोचला आहे.
मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झालं आहे. या मतदारसंघात आता राष्ट्रवादीच्यां अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात उतरला आहे..
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असं असताना आता मलिक आज अर्ज भरणार आहेत.. त्यामुळे शिंदे गट आणि नवाब मलिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार? की कुणी उमेदवारी अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत..