राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. या पार्श्वभूमीवरच जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन आज करणार उमेदवारी अर्ज दाखल केला..उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिराचे घेतले दर्शन घेऊन पूजा केली.तसेच पुन्हा एकदा माहितीचे सरकारी येऊ दे अशी साकडे त्यांनी हनुमंताला घातले..गरीब कल्याणकारी योजना व राज्याचा अधिक विकास होण्यासाठी बहुमताने आमचे सरकार येऊ दे अशी प्रार्थना गिरीश महाजन यांनी हनुमंत चरणी केली..
मंत्री गिरीश महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जामनेर शहरात भव्य रॅली पुण्यात आली यावेळी हजारो संख्येने कार्यकर्ते शहरात दाखल झाले होते.तसेच मोठ्या संख्येने लाडक्या बहिणीसह कार्यकर्त्यांचा फौज फाटा होता…आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जामनेर मतदार संघातून सातव्यांदा मंत्री गिरीश महाजन हे निवडणूक लढवीत आहेत..दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गिरीश महाजन हे मुक्ताईनगर येथे गेले . परतल्यानंतर जामनेर मध्ये शक्तिप्रदर्शन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला..
दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..